महिला सरपंचाचा आज सत्कार महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माविमचा पुढाकार

महिला सरपंचाचा आज सत्कार महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माविमचा पुढाकार

 

भंडारा दि. 8: जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने जिल्हयातील महिला सरपंच व लोकसंचालीत साधन केंद्राच्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार उदया दि.9 मार्च रोजी करण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने अनेक उपक्रम राबविण्यात येतात.त्या उपक्रमातर्गंत महीला आर्थिक विकास महामंडळातर्फे ग्रामीण भागातुन पूढे आलेल्या महिलांना प्रोत्साहन म्हणून महिला संरपचाचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, महिला बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत,असे माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोडे यांनी कळविले आहे.