दि.11 ते 17 डिसेंबर “सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह”

दि.11 ते 17 डिसेंबर “सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह”

 

गडचिरोली, दि.09 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील आदिवासी भागात सिकलसेल हा आजार आढळून येतो. हा आजार अनुवंशिक असून या आजारावर अद्यापर्यंत कोणतेही कायमस्वरुपी उपचार असल्याचे आढळून आलेले नाही. या आजाराने ग्रस्त असलेल्या रोगी व वाहक व्यक्तींवर औषधोपचार करण्यात येत असले तरी या रोगाचा प्रादुभाव पुढच्या पिढीमध्ये टाळता यावा यासाठी जनतेत या विषयी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून शासनाने दिनांक 11 ते 17 डिसेंबर हा कालावधी “सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह” म्हणून शासननिर्णय पारीत करण्यात आलेला आहे. या कालावधीत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी खालील प्रमाणे विविण उपक्रमाचा समावेश करण्यात यावे.

सिकलसेल आजार अनुवंशिक असल्याने सदर रोग कुठल्या पध्दतीने समाजात पसरतो त्याची माहिती लोकांना देणे. तसेच हा रोग समाजात पसरु नये यासाठी लाकांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची माहिती देणे. यामध्ये गावातील लोकांना एकत्र आणून त्यांना या आजार व औषधोपचार याबाबत ची माहिती देण्यात येणार आहे. शाळा महाविदयालयातील मुला मुलींना (वय 12 वर्ष ते 17 वर्ष ) सिकलसेल आजार,त्याचे संक्रमण, संभाव्य धोके इ. बाबत जागृत करण्यात येणार आहे.

जिल्हयात सन 2009 पासून एकुण सिकलसेल ग्रस्त रुग्ण,2632 व सिकलसेल वाहक रुग्ण 35027 शोधण्यात आलेले आहे.सिकलसेल आजाराबाबत प्रदर्शन,चर्चासत्र इ. वरुन या आजाराबाबत माहिती, संभाव्य धोके, औषधोपचार इ.बाबत माहिती देण्यात येणार आहे. सदर जनजागृती करीता अंगनवाडी केंद्र,शाळा, आश्रमशाळा,महाविद्यालय स्तरावर फक्त जनजागृती च्या शिबीराचे आयोजन करुन सिकलसेल आजाराबाबत परीपुर्ण माहिती देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजना व सिकलसेल रुग्णांना अपंगाचे प्रमाणपत्रा बाबत माहिती देण्यात येणार आहे.वरील प्रमाणे सदर शिबीराचा लाभ जिल्हयातील सर्व सिकलसेल रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावे,असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे.