अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एकलव्य निवासी शाळेसाठी प्रवेश परीक्षा 26 फेब्रुवारीला

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एकलव्य निवासी शाळेसाठी प्रवेश परीक्षा 26 फेब्रुवारीला

भंडारा, दि. 22 : आदिवासी विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात इयत्ता 5 वी ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शैक्षणिक सत्र 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी एकलव्य निवासी पब्लिक स्कूल प्रवेश परीक्षा 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

भंडारा, मोहाडी, पवनी या तालुक्यासाठी परीक्षा केंद्र जकातदार माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, भंडारा, तुमसर तालुक्यासाठी जनता विद्यालय, तुमसर तर साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यासाठी नंदालाल पाटील कापगते विद्यालय, साकोली येथे परीक्षा केंद्र आहेत. तरी पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.