ब्रह्मपुरीचे एसडीओ संदीप भस्मे यांची राज्यातील सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून निवड

ब्रह्मपुरीचे एसडीओ संदीप भस्मे यांची राज्यातील सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून निवड

Ø मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदार जनजागृती अभियानात सर्वोत्कृष्ट कार्य

चंद्रपूर, दि.25 : ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्मे यांची मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये सन 2022-23 या वर्षात राज्यातील सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

73-ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील एकूण 313 छायाचित्र मतदार यादी भागाच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 मध्ये 100 मतदार नोंदणी, नावाची वगळणी करणे तसेच मतदार संघातील 68 टक्के मतदारांचे मतदार ओळखपत्रासमवेत आधार जोडणी यासंबंधी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय मतदार दिनी मुंबई येथे गौरव करण्यात आला.

 

या कामाच्या यशस्वीतेसाठी 73-ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातंर्गत असलेल्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून ब्रह्मपुरीच्या तहसीलदार उषा चौधरी, सिंदेवाहीचे गणेश जगदाळे व सावलीचे परीक्षित पाटील यांनी मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानामध्ये वेळोवेळी केलेल्या पथक प्रयत्नामुळे पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी संदीप भस्मे यांनी मत व्यक्त केले. तसेच ब्रह्मपुरी येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गीता आंबोरकर, पुरुषोत्तम चुऱ्हे, हेमंत मेश्राम, वंदना केळकर, गंगाधर भोयर, आनंद मगर, सरिता कावळे, प्रतिक्षा पांडे, दिलीप बावनकर, योगेश परचाके, ओमप्रकाश साळवे, विलास सुखदेवे, खुशाल लंजे तर सावली तालुक्यातील अनंत दुधे, राजेंद्र बोरकुटे, विशाल कावळे तसेच सिंदेवाही तालुक्यातील संजय गेडाम, पितांबर पोवनकर यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.

 

ब्रह्मपुरीचे नायब तहसीलदार विजय सयाम, सावलीचे नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी मतदार नोंदणी संदर्भात सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून काम पूर्ण करण्याबाबत प्रयत्न केले. तसेच कार्यालयातील अव्वल कारकून वसंत पर्वते, डाटा ऐन्ट्री ऑपरेटर सुभाष कांबळे, कैलास मोहुर्ले, अमित दुधे यांनी प्राप्त झालेले सर्व दावे व हरकती विहित मुदतीत डेटा ऐन्ट्री करून मतदार नोंदणीचे काम पूर्ण करण्यास सहकार्य केले, असे ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्मे यांनी कळविले आहे.