शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलेचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे-डॉ केशवराव शेंडे

शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलेचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे-डॉ केशवराव शेंडे

सिंदेवाही प्रतिनिधी। दरवर्षी आपण शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित करीत असतो ते या करिता की विद्यार्थ्यांच्या अंगी लपलेले कलागुण सर्वांच्या समोर यावे आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा त्यांच्यातील कलाकार जागृत व्हावा याकरिता असे कार्यक्रम घेणे आवश्यक असते कारण स्नेहसंमेलन म्हणजे आपली कला सादर करण्याचे सर्वात मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ केशवराव शेंडे साहेब यांनी केले ते स्नेहसंमेलनाचे उदघाटक म्हणून बोलत होते

संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ सिंदेवाही द्वारे संचालित स्व.सिताबाई शेंडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाहीयेथे स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न झाले या मध्ये विविध क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।

या प्रसंगी आयोजित विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत शेंडे होते तर प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी देवेंद्र मंडलवार अजय कटारे महेश मंडलवार आक्रोश खोब्रागडे हे होते.

 

यावेळी , कबड्डी, गोला फेक व रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या. दुसर्‍या सत्रात प्रश्नमंजुषा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, सारेगामापा स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.

यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी सर्व स्पर्धामध्ये प्राचार्य व सर्व प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी अथक परिश्रम घेतले.