प्रधानसेवक नरेंद्र मोदीच आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ,कर्तृत्ववान पंतप्रधान-हेमंत पाटील

प्रधानसेवक नरेंद्र मोदीच आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ,कर्तृत्ववान पंतप्रधान-हेमंत पाटील

५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष लवकरच साध्य होणार

मुंबई, १२ जानेवारी २०२३

देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत विकास पोहचवून त्याला विकासगंगेच्या मुख्यधारेत आणण्यासाठी देशाचे ‘प्रधानसेवक’ पंतप्रधान नरेंद्र मोदी सदैव कार्यतत्पर आहेत,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी केले.आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी पंतप्रधान विशेष कार्यरत असतात.अशात आतापर्यंत झालेल्या पंतप्रधानांपैकी ‘प्रधानसेवक’ नरेंद्र मोदीच सर्वश्रेष्ठ आणि कार्यकर्तृत्ववान म्हणून समोर आले आहेत,अशा शब्दात पाटील यांनी मोदींच्या कार्याचा गौरव केला.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू,इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंह यांनी जी कामे केली नाहीत, ती कामे मोदी यांनी करून दाखवली.देशात आता विविध योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बॅक खात्यात थेट निधी जमा होतोय. निधी वाटपात एका पैशांचा भ्रष्टाचार होत नाही. त्यामुळे भारताने भ्रष्टाचारामुक्तीच्या दिशेने पावूल टाकले आहे, हे विशेष.पंतप्रधानांचे महत्वाकांक्षी नेतृत्व,दूरदृष्टीमुळेच हे शक्य झाले आहे. देशातील पायाभूत सुविधांसह विविध विकासकार्य, महामार्ग, विमानतळे, बांधकामे वेगाने सुरू आहेत.भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केंद्राने आखल्या आहेत,असे समाधान पाटील यांनी व्यक्त केले.

भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची हयगय केली जात नाही. अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाते.देशासमोर उभ्या असलेल्या सर्व समस्यांवर पंतप्रधानांनी मात केली आहे. ५ ट्रिलियन च्या दिशेने देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताविषयी वातावरण आणखी सकारात्मक झाले आहेत. अनेक कंपन्या भारतात गुंतवणुकीसाठी येत आहेत. देशातील बड्या कंपन्या विदेशात मोठी गुंतवणूक करीत आहेत.