बारावी किंवा आयटीआय पात्र मुलींसाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा ॲडव्हान्स डिप्लोमा · 18 महिन्यांच्या मोफत अभ्यासक्रम · महिला उमेदवारांनी लाभ घ्या- कौशल्य विकास विभागाचे आवाहन

बारावी किंवा आयटीआय पात्र मुलींसाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा ॲडव्हान्स डिप्लोमा

· 18 महिन्यांच्या मोफत अभ्यासक्रम

· महिला उमेदवारांनी लाभ घ्या- कौशल्य विकास विभागाचे आवाहन

भंडारा, दि. 29 : चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीची शाश्वती देणाऱ्या 18 महिन्यांच्या कालावधीच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग या मोफत अभ्यासक्रमासाठी 17 ते 28 वयोगटातील मुलींनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. आकांक्षा कौशल्यातून जीवन्नतीकडे या राज्य शासनाच्या महिलांच्या मोफत धोरण अंतर्गत ही संधी दिली जात आहे. प्रशिक्षणार्थींची निवड विहित प्रक्रियेव्दारे करण्यात येणार असून यासाठी विद्यार्थी परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाईन पध्दतीने देऊ शकतात. ऑनलाइन परीक्षेचा कालावधी 10 ते 30 जुलै राहणार आहे. तर ऑफलाईन परीक्षा 7 ऑगस्ट रोजी अमरावती व नागपूर विभागातील अकराही जिल्ह्यात शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी नोंदणी करुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास सुधाकर झळके यांनी केले आहे.

18 महिन्याच्या या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन परीक्षेसाठी http://bitly.ws/sAa8 या लिंकवर नोंदणी आणि ऑनलाइन परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर निशुल्क प्रशिक्षण निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण कालावधीमध्ये लॅपटॉप सुविधा, प्रशिक्षित व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर, प्रशिक्षण व मूल्यमापनानंतर नामांकित कंपनी, स्टार्टअपमध्ये रोजगाराची हमी देखील दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात अन्य जिल्ह्यातून विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असून भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी देखील या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्र मार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाशी 07184- 252406 किंवा 7620297377 या क्रमांकावर संपर्क साधावा.