सिंदेवाही | मा.सा. कन्नमवार यांची 123 वी जयंती साजरी

सिंदेवाही | मा.सा. कन्नमवार यांची 123 वी जयंती साजरी

 

तालुका बेलदार समाज संघटना सिंदेवाही द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्वर्गीय मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची 123 वी जयंती चा कार्यक्रम सिंदेवाही स्थित मनमंदिर सभागृह येथे दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला. जयंती कार्यक्रम समारोह करिता अध्यक्ष म्हणून श्री मधुकरराव मूप्पीडवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच प्रमुख पाहुणे श्री स्वप्निल कावळे नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही,श्री चंद्रशेखर भंडारवार सहाय्यक शिक्षक सावित्रीबाई फुले विद्यालय गिरगाव, श्री दत्तात्रयजी कारडवार समाजसेवक गडबोरी, सौ मंगलाताई इरटवार, श्री सुरेशराव गुज्जनवार जेष्ठ समाजसेवक सिंदेवाही, तसेच बेलदार समाजातून नवनियुक्त सत्कारमूर्ती समाजसेवक म्हणून निवडून आलेले श्री पंकजभाऊ नन्नेवार नगरसेवक नगरपंचायत सिंदेवाही, सौ. पूजाताई अलमवार उपसरपंच गडमौशी, श्री पुणेशभाऊ गांडलेवार सदस्य ग्रामपंचायत गुंजेवाही तसेच समाज कार्य करणारे बाळू फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमित महाजनवार विस्तार अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांचे उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात स्व.मा.सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली .सर्वप्रथम तालुक्यातील स्वर्गवासी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर समस्त समाज बांधवांच्या वतीने उपरोक्त सत्कारमूर्तींचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुक्यातील उपस्थित समाजातील गडबोरी गडमौशी, गुंजेवाही व सिंदेवाही येथील मुला मुलींचे व महिलांचे समूह व एकल नृत्य सादर करण्यात आले व या प्रसंगी त्यांचे सुद्धा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय भाषणात माननीय मधुकरराव मूप्पीडवार यांनी समाज संघटना ,तालुक्यातील समाज संघटना बळकटीकरण व स्व.मा.सा कन्नमवार यांचे जीवनपटावर माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री अभिजीत मुप्पीडवार अध्यक्ष तालुका शाखा बेलदार समाज संघटना सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली तालुका शाखा सिंदेवाही यांनी केले. कार्यक्रमाकरिता श्री अक्षय जिडगिलवार यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. याप्रसंगी उपस्थित सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचलन श्री प्रशांत गोर्लावार यांनी केले तर प्रास्ताविक श्री अमित गुज्जनवार व आभार श्री चंदू कंदलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री प्रकाशराव रेगुलवार, श्री संतोषराव गुंतीवार, श्री दिनेशराव बोनगीरवार ,श्री अमोल कोंडापूरवार ,श्री हर्षद निरडवार ,श्री अजय बलगेवार, श्री प्रमोद अलमवार गडमौशी, सुरेश गांडलेवार गुंजेवाही, सुशांत इरटवार ,रोहित बेझलवार, पुरुषोत्तम भंडारवार ,राजू इरटवार, प्रवीण इरटवार ,अविनाश जट्टलवार आशु निरडवार, दीपक प्रेमलवार गडबोरी ,हर्षल गुज्जनवार,गणेश मलकमवार गडबोरी व महिला आघाडी तालुका सिंदेवाहीचे सौ .प्रणालीताई ईरटवार,सौ. रागिनी गोर्लावार ,सौ.मयुरी नन्नेवार, सौ. राणी कोंडापूरवार,सौ. पूजा जट्टलवार, सौ. वैशाली ईरटवार, सौ. संगीता इरटवार, सौ. कोमल गुज्जनवार यांचे विशेष सहकार्य लाभले.