सिंचनासाठी ईटियाडोह धरणाच्या पाण्याचा योग्य वापर करा.-आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे

सिंचनासाठी ईटियाडोह धरणाच्या पाण्याचा योग्य वापर करा.-आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे

पाणी वापर संस्थाची बैठक.

संजीव बडोल, प्रतिनिधी.

  1. नवेगावबांध दि.31ऑक्टोबर:-गोंदिया, भंडारा, व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचनासाठी वरदान ठरलेल्या अर्जुनी मोर. तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या पाण्याचा शेतीच्या सिंचनासाठी योग्य पध्दतीने वापर करा. असे आवाहन अर्जुनी मोर .विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले आहे.गोठणगाव इटियाडोह धरणाच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पाणी वापर संस्थाच्या बैठकीत ( ता. 31 )आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे होते.सभेला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश सोनटक्के, पाणी वाटप समिती चे प्रकल्प स्तरीय अध्यक्ष नामदेव सोरते, प्रमोद लांजेवार, कार्यकारी अभियंता भिवगडे,तथा सर्व पाणी वाटप समिती चे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे म्हणाले की, ईटियाडोह धरणाच्या पाण्यामुळे वरिल तिन्ही जिल्ह्यातील शेतीला सिंचनाची सोय होत असल्याने येथील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे . तिन्ही जिल्ह्यात धानाचे मुख्य पिक घेतल्या जात असुन, धान पिक निघेपर्यंत या पिकाला मुबलक पाणी लागते. त्यामुळे खरीप पिकानंतर रब्बी पिकासाठी शेतकरी अन्य पिकांकडे वळत आहेत. मका पिकाला सिंचनासाठी पाणी कमी लागत असुन, उत्पादन दुप्पटीने होत असते.यावर्षी च्या रब्बी पिकासाठी शेतकरी व पाणी वाटप समिती चे पदाधिकारी यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाचविण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले आहे. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनीही सभेला मार्गदर्शन केले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनीही इटियाडोह धरणाची आजची पाण्याची परिस्थिती व पुढे शेतकरी हितासाठी घेण्यात येणारे निर्णय याबाबत सविस्तर माहिती दिली.