विजय गेडाम यांचा सेवानिवृत्ती सत्कार.

विजय गेडाम यांचा सेवानिवृत्ती सत्कार.

 

संजीव बडोले, प्रतिनिधी .

नवेगावबांध दि.1नोव्हेंबर:-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नवेगावबांध येथील कर्मचारी विजय गेडाम नियत वयोमानानुसार दि.31ऑक्टोबर रोज शनिवार ला सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त त्यांचा निरोप व सत्कार कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रज्ञा शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव सुखदेवराव दहिवले संस्थेच्या अध्यक्षा मालिनीताई दहिवले ,मुख्याध्यापक किशोर शंभरकर,सहसचिव अनिलकुमार दहिवले आणि सदस्य सौ नूतनताई दहिवले उपस्थित होते.त्यांचा सपत्निक शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते