असंसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायकल रॅली चे आयोजन

असंसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायकल रॅली चे आयोजन

भडारा, दि. 20 : आरोग्य विभाग, भंडारा तर्फे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज असंसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले. दिवसेंदिवस देशात मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग जसे – तोंडाचा, स्तनाचे, गर्भाशयाचे कर्करोग वाढत आहेत. या आजारावर मात करण्यासाठी व असे आजार होऊ नये यासाठी योग्य व वेळेवर आहरासोबतच शारीरिक व्यायाम सुद्धा आवश्यक आहे. करिता जनतेमध्ये अशा आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सदर रॅली चे आयोजन करण्यात आले होते. ही सायकल रॅली जिल्हा परिषद भंडारा  इथून सुरू करण्यात आली व राजीव गांधी चौक- गांधी चौक  मार्गे जिल्हा सामान्य रुग्णालयात सदर रॅली ची सांगता करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी, आय एम ए सदस्य, आय डी ए सदस्य, निमा सदस्य व इतर उपस्थित होते. सर्व सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धीनी केंद्रात असंसर्गजन्य रोगांची तपासणी मोफत करून घेण्याचे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे व अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर यांनी केले आहे.