रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त.

रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त.

चान्ना येरंडी येथे तलाठी गस्ती पथकाची कारवाई.

 

 

संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

नवेगावबांध दि. 30 ऑक्टोंबर:-
अर्जुनी मोर तालुक्यात गौण खनिज रेती चोरी करणार्‍या विरुद्ध कारवाई करत तलाठी गस्ती पथकाने चांनाबाकटी येरंडी येथे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केला आहे.ही कारवाई आज दि.29 ऑक्टोबर रोज गुरुवारी रात्री 10.30वाजता करण्यात आली.
अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तलाठी पुंडलिक कुंभरे, चचाने,टेंभरे,मिलिंद जांभुळकर,आशिष रंगारी यांचे पथक गस्त घालत असताना दि.29 ऑक्टोंबर रोज गुरुवारी गस्ती घालत असतांना चांना येरंडी येथे धनपाल भैयाजी उंदिरवाडे राहणार सानगडी जि. भंडारा यांच्या मालकीचा आयशर 380 कंपनीचा सिल्व्हर रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 36,झेड 2486 ,ट्राली क्रमांक एमएच 36,9094 चालक सदानंद देवाजी जांभुळकर राहणार सानगडी जि. भंडारा हा चालक अवैधरीत्या विनापरवाना एक ब्रास रेतीची वाहतूक करताना आढळला. तलाठी पथकाने पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये ट्रॅक्टर चालक व मालकावर कारवाई करण्यात आली आहे.