chandrapur I विविध कामांचे खासदार अशोक नेते आणि माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते भूमीपुजन

विविध कामांचे खासदार अशोक नेते आणि माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते भूमीपुजन

ब्रम्हपूरी पंचायत समिती अंतर्गत १५ वा वित्त आयोग.पंचायत समिती स्तर अंतर्गत पंचायत समिती कामांचे भूमीपुजन दिनांक ३ जूनला चिमूर- गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते आणि माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पंचायत समितीचे सभापती रामलाल महादेव दोनाडकर, उपसभापती सुनिता ठवकर, पं. स. सदस्य नीलकंठ मानापुरे उपस्थित होते.
आवळगांव पंचायत समिती गणाचे नेतृत्व करणारे सभापती श्रामलाल महादेव दोनाडकर यांनी सुचविलेल्या कामांमध्ये बरडकिन्ही येथे बंदिस्त नाली बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले.
याप्रसंगी बरडकिन्ही येथील ज्येष्ठ भाजपा नेते देवराव नखाते. माजी सरपंच विजय हूड, भाजपा युवा नेते विनोद ठाकरे .हरिश्चंद्र दोनाडकर, मा.अध्यक्ष, स.स. सं. म. हे उपस्थित होते.
वांद्रा येथे सीसी रोड बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले यावेळी सरपंच महादेव मडावी, उपसरपंच गुरुदेव वाघरे, सदस्य प्रमोद सातपुते,लोमेश गेडाम, कविता पाल, संगिता ठाकरे,अंजली राऊत, ताराबाई कामडी, मेश्राम सर, पांडुरंग पाल, रामकृष्ण मेश्राम, महादेव मेश्राम, ईश्वर घुबडे उपस्थित होते.
गांगलवाडी येथील अंगणवाडी क्र ३ ला ४० मीटर संरक्षण भिंतीचे बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती सुनिता ठवकर ,सरपंच धनंजय बावणे, ग्रा. पं. सदस्य विवेक बनकर ,मालन म्हशाखेत्री, चंदा म्हशाखेत्री, हिरकन्या कोसे, भाजपा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष राजेश्वर मगरे, ग्राम विस्तार अधिकारी मेश्राम उपस्थित होते.
मुडझा येथे पं स. सदस्य नीलकंठजी मानापुरे,रेवता नीलकंठजी मानापुरे यांचे कडून मुडझा प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले.
१५ वित्त आयोग पंचायत समिती स्तर कामामध्ये मुडझा येथे नाली बांधकाम आणि शोषखड्डा बांधकाम आणि १६ वित्त आयोग ग्रा. पं स्तरावर वस्तीत नाली बांधकामाचे देखील भूमीपुजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच होनाजी नैताम, उपसरपंच लोमेश राऊत, व सर्व ग्रा.पं.सदस्य तथा सदस्या तसेच ग्रामसेवक मेश्राम उपस्थित होते.