chandrapur I पीक कर्जासाठी बँकेने शेतकऱ्यांना त्रास देणे बंद करा आम आदमी पार्टीची मागणी

पीक कर्जासाठी बँकेने शेतकऱ्यांना त्रास देणे बंद करा आम आदमी पार्टीची मागणी

तात्काळ शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळवून द्यावे .अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने आम आदमी पार्टीने केली आहे जर ही मागणी लवकरात लवकर मान्य झाली नाही तर आम आदमी पार्टी संपूर्ण शेतकऱ्याला हाताशी धरून पिक कर्ज मिळवून देण्यासाठी उग्र आंदोलन करेल .
जिवती तालुक्यातील कुंभेझरी तथा लांबोरी येथील शेतकरी यांनी आपचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
जिवती तालुक्यात पाटण येथे सध्या स्टेट बँक ही एकच राष्ट्रीयकृत बँक आहे .या बँकेमध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे खाते आहे.या बॅकेबद्दल अनेक शेतक-याच्या तक्रारी आहेत. एकीकडे कोरोनामुळे सामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण झाले आहे वारंवार वाढत असलेले जीवनावश्यक वस्तूचे भाव तथा शेती अवजाराचे भाव ,बियाणे, खताच्या किमती गगनाला भिडल्या आहे या परिस्थितीत जिवती तालुक्यातील स्टेट बँक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी त्रास देत आहे. कुंभेझरी व लांबोरी येथील शेतकऱ्यांनी सन 2018/ 19 शेतीवरील पीक कर्ज घेतले .महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये पिक कर्ज माफ झाले. पुन्हा बँकेकडे कर्ज मागणी करिता अर्ज सादर केले असता आपले गाव सर्विस एरियामध्ये येत नाही असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे शेतक-याना व पिक कर्ज देण्यापासून त्यांना वंचित ठेवलेले आहे. शेतकरी दुसऱ्या बँकेमध्ये पिक कर्ज मागण्या करता गेले असता त्या ठिकाणाहून सुद्धा आपण या अगोदर ज्या बँकेमधून कर्ज घेतले त्याच बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज करावे असे सांगितले जात आहे सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळाले नाही तर बी बियाणे, खते, औषधी, कसे घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे .सदर बँकेने पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय ऊरणार नाही.
वरील विषयाचा गांभीर्याने विचार करावा व तात्काळ शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळवून द्यावे .अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने आम आदमी पार्टीने केली आहे जर ही मागणी लवकरात लवकर मान्य झाली नाही तर आम आदमी पार्टी संपूर्ण शेतकऱ्याला हाताशी धरून पिक कर्ज मिळवून देण्यासाठी उग्र आंदोलन करेल .
जिल्हाधिकारी याना निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे जिवती तालुका अध्यक्ष श्री मारुती पुरी , शेतकरी मुकींद शंकर राठोड ,नागनाथ यादवराव ठोंबरे, गणेश बालाजी गिरी, संग्राम कोडींबा ठोंबरे ,बळीराम नामदेव ठोंबरे , सुपारी रामू मडावी ,वामन आत्राम भिमु पोतु कुमरे, भिमु कर्णु कोडापे ,मारोती कोडापे तथा इतर अनेक कुंभेझरी व लांबोरी येथील शेतकरी उपस्थित होते.