chandrapur I सिंदेवाही : तलावातुन म्हशीला काढण्यासाठी गेला व अखेर जिव गमावला

तलावातुन म्हशीला काढण्यासाठी गेला व अखेर जिव गमावला

काल २८ तारीख रोजी मृतक पळसराम धुलाराम गुंरलेे सामदाा  यांनी स्वताच्या घरच्या म्हशी चराई करविण्यासाठी तलाव परिसरात नेला होता. म्हशी चराई करता-करता आसोंलामेंढा तलावात पाणी पिण्यासाठी गेल्या परंतु अती खोल पाण्यात गेल्याने म्हशी पाण्यावर तरंगत होते मृतकाने म्हशी पाण्यात डुबुन मरून न जावं या भितिने त्यांना काढण्यासाठी तलावात जावुन प्रयत्न करीत असतांना शेवटी स्वताचं जीव गमावला.
मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे आणण्यात आले होते.
या घटनेचा तपास सिंदेवाही चे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात सुरू आहे