भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतुलचंद्र कुमार यांचे योगदान,नातवाने जपल्या आजोबांच्या आठवणी…

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतुलचंद्र कुमार यांचे योगदान,नातवाने जपल्या आजोबांच्या आठवणी…

या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे फार मोठे योगदान आहे. देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस हे सुद्धा प्रमुख स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना या कार्यात अनेक महान क्रांतिकारकांनी साथ दिली. त्यांत एका स्वातंत्र्य सैनिकाचे महान योगदान होते. त्यांचे नाव आहे अतुलचंद्र कुमार. ते आज आपल्यात नाहीत. परंतु त्यांचे नातू सौम्यजीत ठाकुर हे नागपुरात प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या आजोबांच्या अनेक आठवणी असुन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या आजोबांच्या योगदानाचा त्यांना फार अभिमान आहे.
अतुल बाबु यांचा जन्म 5 एप्रिल 1905 रोजी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील अराईडांगा येथे दिनानाथ कुमार आणि कत्तयायनी देवी यांच्या पोटी झाला. बालपणा पासुनच त्यांचे गुण पाळण्यात दिसु लागले. 1921साली त्यांनी गांधीजींच्या असहयोग आंदोलनात सक्रिय भाग घेतला. मॅट्रिक नंतर त्यांनी बेरहमपुर येथील कृष्णनाथ कॉलेजमध्ये प्रवेश केला. जिथे त्यांनी विद्यार्थी संघटनाची स्थापन केली आणि सचिव म्हणून काम केले. या क्षमतेमध्ये त्यांनी सरोजिनी नायडू  आणि चित्तरंजन दास यांसारख्या नेत्यांना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठी आमंत्रित केले. बंगालच्या तत्कालीन गवर्नर स्टॅनली जॅकसन याने भारता विरोधात भाषण केल्याने एका कार्यक्रमात त्यांना बुट फेकून मारले. त्यासाठी त्यांना महाविद्यालयातून निष्कासनाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी कोलकत्यातील बंगबाशी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑल बेंगॉल स्टुडेंट्स युनियनचे सहायक सचिव म्हणुन काम केले तर 1928 मधे अराईडांगा परिसरात दिनानाथ भोलानाथ मॉडेल अकादमी शाळेची स्थापना केली. अराईडांगा सारख्या दूरच्या क्षेत्रात आधुनिक शिक्षणाच्या प्रसारणात हा मोठ्या योगदान होता. 1930 मधे त्यांनी मिठाच्या सत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांना एका वर्षाची कैद झाली. सायमन कमिशनच्या विरोधात विद्यार्थ्यांची एकजूट केल्याने त्यांना पुन्हा कारावास  भोगावा लागला. मालदा जिल्हा कॉंग्रेस कमेटीत कार्यरत अस्ताना त्यांनी असहयोग करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्याला बऱ्याच वर्षांपासून तुरुंगात टाकण्यात आले आणि 1936 मध्येच त्याला सोडण्यात आले. कारावास दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर क्रांतिकारकांच्या स्थळ आणि कार्यकलापांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात छळ केले. परंतु ते काहीही माहिती त्यांच्याकडून मिळवु शकले नाही.1937 ते 1946 पर्यंत ते बंगाल विधानसभेचे आमदार म्हणुन कार्यरत होते.1938-39 दरम्यान त्यांनी कॉंग्रेसच्या हरिपुरा आणि त्रिपुरी सत्राचे अध्यक्ष पदासाठी नेताजींच्या निवडणूक सक्षम केले. ऑगस्ट 1938 मध्ये त्यांनी नेताजी सोबत चीनमध्ये एक वैद्यकीय प्रतिनिधीमंडळ पाठवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. चीन-जपानी युद्धादरम्यान हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या चिनी लोकांसाठी समर्थनाचा प्रतीक होता. 1942-43 या काळात ए. के. फज़लुल हक आणी ख़्वाजा नाझीमुद्दीन यांच्या मंत्रिमंडळात अतुलबाबुंनी महत्त्वाचे खाते सांभाळले. भारतातील शिक्षणाचे सांप्रदायिकरण हा मोहम्मद अली जिनाहची वाईट योजना होती. अतुल बाबूंनी फज़लुल हक आणि शरतचंद्र बोस सोबत त्यांच्या वाईट योजनेचा भंग केला. ऑक्टोबर 1943 मध्ये नेताजींनी बर्मा मोर्च्यावरील मद्रासचे टी. के. राव ला जपानी पाणबुडीत कठियावाड तट वर अतुल बाबु आणि त्यांचे सहकार्यांना महत्वाचे कागदपत्रे व निर्देश देण्यासाठी पाठविले. पण त्यांच्या सहकार्यांना अटक झाली म्हणून फक्त अतुल बाबू ही कागदपत्रे प्राप्त करण्यास आणि नेताजींच्या निर्देशांचा पालन करण्यास सक्षम झाले.
1940 च्या दशकाच्या अखेरीत नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय राजकारणातुन दूर जात असतांना ते सामाजिक कार्याकडे वळले. सामाजिक कार्यात पण अतुल बाबुंचा मोठा योगदान होता. बंगालच्या लोकांवर त्यांचे मोठे प्रेम होते. पूर व दुष्काळ यांसारख्या आपत्तीमध्ये त्यांनी लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केले. थोड्या सहकार्यांसह तो जलप्रलयातून धोकादायक मार्गाने प्रवास केला आणि वार्षिक पूरांदरम्यान अनेक जीव वाचविले. 1950च्या दशकाच्या अखेरीत त्यांनी कॉंग्रेस सोडली आणि सी. राजागोपालाचारी यांच्या स्वातंत्र्य पक्षात शामिल झाले. 1955 मध्ये त्यांनी दरभंगाच्या महाराजा कामेश्वर सिंहच्या निर्देशात ‘मिथिला इन इंडिया’ हा पुस्तकांचा सहलेखन केले आणि सोवियत संघाचे नेते निकोलाई बुल्गनीन आणि निकीता क्रुश्चेव यांनी हे पुस्तक सादर केले. आचार्य विनोबा भावे यांच्या1962 मालदा भेटीदरम्यान, त्यांनी त्यांच्या बैठक आणि क्रियाकलापांचे समन्वय केले. आयुष्याच्या उत्तरार्थात त्यांनी भाड्याने जमीन कसणाऱ्या शेतकर्यांना छळणाऱ्या जमीनदारांचा सामना  करीत त्या शेतकर्यांना न्याय मिळवून दिला.
16 सप्टेंबर 1967 रोजी देशाच्या हा महान सुपुत्राने कोलकाता येथे अंतिम श्वास घेतला. पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या स्मृति साठी मालदा येथील मोकदुमपुर मार्केटचे नामकरण ‘अतुल मार्केट’ असे ठेवले. सौम्यजीत पण आपल्या आजोबांचा आदर्शावर चालत आहे आणि समाजासाठी महत्त्वाची योगदान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच्याकडे आजोबांचे पत्र, ऑडियो रेकॉर्ड तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस आणी अतुलबाबुंच्या छायाचित्रांच्या संग्रह असुन तो त्याने प्राणपणाने जपुन ठेवला आहे.