सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावाचे आयोजन सुवर्णसंधी  सुवर्णसंधी  सुवर्णसंधी

भंडारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी पंडित दीनदयाल

उपाध्याय महारोजगार मेळावाचे आयोजन सुवर्णसंधी  सुवर्णसंधी  सुवर्णसंधी

           भंडारा,दि.6 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर यांचे संयुक्त विद्यमाने   दिनांक 8 सप्टेंबर  2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर तालुका तुमसर जिल्हा भंडारा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

         सदर मेळाव्यामध्ये खालील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 🎯 Kapston facilities management limited Hyderabad — 500 जागा

🎯 Sunsoor Srushti Enterprises Wardha –30 जागा

🎯 ARMS I Pvt.Ltd under DUROVSLVE I Pvt.ltd.Chhatrapati Sambhajinagar  –80 जागा

🎯 BVG INDIA LTD.Pune –20 जागा

🎯 BSA Corporation Ltd.Pune –300 जागा

🎯 LIC Bhandara –100 जागा

🎯 NavKisan Bio Plaantec Ltd.Nagpur –30 जागा

🎯 Devgiri Forgings Pvt.Ltd.Chhatrapati Sambhajinagar –100 जागा

🎯 Bajaj Auto Ltd.Chhatrapati Sambhajinagar–100 जागा

🎯 Devgiri Forgings Pvt.Ltd.Waluj Chhatrapati Sambhajinagar –100 जागा

🎯 Bhogale Auto Compo Pvt.Ltd.Chhatrapati Sambhajinagar –100 जागा

🎯  Trinetra Padun Krushi and Gramin Bahuuddeshiya Shikshan Sanstha Bhandara –8 जागा

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक व गरजू युवक व युवतींनी  याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा येथील सहाय्यक आयुक्त श्री सुधाकर झळके यांनी केले आहे.

                                                    📢 मेळावा दिनांक :- 8 सप्टेंबर 2023

📢 वेळ :- सकाळी 11.00 ते दुपारी 3.00

📢 ठिकाण :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर तालुका तुमसर जिल्हा भंडारा

📢 नोंदणी करण्यासाठी लिंक https://forms.gle/TUDCyj9cbSsNKFDX6