गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुर भेटी दरम्यान घडलेला कथित सिलेंडर ब्लास्ट प्रकरण
आज जिल्ह्यात पंचायत राज समिती चे तपासणी चमू विविध तालुक्यात दौऱ्यावर असून याच दरम्यान गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात भेटीदरम्यान ऑक्सीजन सिलेंडर चा स्फोट होऊन यात समिती अध्यक्ष संजयजी रायमुलकर हे जखमी झाल्याचे वृत्त सोशल मीडियासह इतर प्रसारमाध्यमांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरले. मात्र या प्रकरणाची खोलवर चौकशी केली असता असा कुठलाही प्रकार घडलेला नसून स्फोटाची बातमी ही अफवा असल्याचे सांगत दुपारी तीन वाजता चे दरम्यान पंचायत राज समिती अध्यक्ष संजयजी रायमुलकर हे बल्लारशा येथे आढावा सभा घेत असल्याची माहिती समिति पदाधिकारी राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांनी कळविली आहे .
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की,आज दुपारी एक ते दोन वाजताच्या दरम्यान पंचायत राज समिती चमूने गोंडपिपरी तालुका दौऱ्यावर असताना तालुक्यातील आक्सापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट दिली. याच दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक साहित्याची चाचपणी चमूचे मार्फत करण्यात आली. तर साहित्यामध्ये वर्ष 2019 मध्ये सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला होता. या सिलेंडरची तपासणी करताना केवळ पाईप निघाल्याने काही काळासाठी वायू बाहेर आला मात्र यामुळे कुठलेही नुकसान झाले नाही किंवा चमूतील कोणतीही व्यक्ती यांना इजा झाली नाही. केवळ पाईप निघाल्याच्या कारनाला वेगळा रंग देत समितीच्या चमूच्या भेटीदरम्यान सिलेंडर स्पोट झाल्याचे वृत्त सोशल मीडिया सह प्रसारमाध्यमांपर्यंत पोचलेले असून वृत्त पसरविणाऱ्या व्यक्तींनी घटनेची शहानिशा न करता केवळ अफवा पसरवण्या चे कार्य केले आहे. आक्सापुर भेटीदरम्यान कुठलाच अनाठाई प्रकार घडला नसल्याचे समितीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळले असून समिती अध्यक्ष संजयजी रायमुलकर हे सुखरूप आहे. व ते सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात आढावा बैठक घेत असल्याची विश्वसनीय माहिती पंचायत राज समिती पदाधिकारी तथा राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांनी अधिकृतपने फोनवर दिली आहे.