मुल शहरात वळण मार्ग व रेल्वे उड्डाणपूलाच्‍या बांधकामाला मंजूरी रस्‍ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयातर्फे ७५ कोटी रू. निधी मंजूर

मुल शहरात वळण मार्ग व रेल्वे उड्डाणपूलाच्‍या बांधकामाला मंजूरी

रस्‍ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयातर्फे ७५ कोटी रू. निधी मंजूर

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे यश

मुल शहरातील मुख्‍य मार्गाचे सिमेंटीकरण, शहरातील अंतर्गत रस्‍त्‍यांचे सिमेंटीकरण यासह विकासकामांची दिर्घ मालिका तयार करून मुल शहराचा चेहरा मोहरा बदलविणारे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल शहरात राष्‍ट्रीय महामार्ग ९३० अंतर्गत बायपास रोड चे बांधकाम अर्थात वळण मार्गाचे बांधकाम व रेल्‍वे उड्डाण पुलाचे बांधकाम मंजूर करण्‍यात आले आहे. यासाठी रस्‍ते परिवहन व राजमार्ग मंत्रालय नवी दिल्‍ली यांच्‍या दिनांक २२ जून २०२१ च्‍या मंजूर वार्षीक नियोजनाअंतर्गत ७५ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.
 
मुल शहरात वळण मार्गाचे आरओबी चे बांधकाम राष्‍ट्रीय महामार्ग ९३० अंतर्गत करावे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला, त्‍यांच्‍या या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले असून एकूण ६.० कि.मी. लांबीचे दोन लेन पेव्‍ड शोल्‍डरसह कॉंक्रीट रस्‍ता व रेल्‍वे उड्डाण पुलाचे बांधकाम करण्‍यात येणार आहेत. या मंजूर वळण मार्गाच्‍या ठिकाणाहून रेल्‍वे लाईन जात असल्‍यामुळे बांधण्‍यात येणारा रेल्‍वे उड्डाण पुल या प्रक्रियेत अतिशय महत्‍वपूर्ण ठरणार आहे.
या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरात विकासकामांची मोठी मालिका तयार केली आहे. पूर्वी सुमार दिसणारे हे शहर आज अतिशय देखणे झाले आहे. मुल शहरात प्रवेशताच सिमेंटचे मुख्‍य रस्‍ते व या रस्‍त्‍यांच्‍या मध्‍यभागी दुभाजकावर हिरवी झाडे व देखण्‍या प्राण्‍यांच्‍या प्रतिमा यामुळे मुल शहर अतिशय सुरेख दिसते. राज्‍याचे दुसरे मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार सांस्‍कृतीक सभागृह आणि स्‍मारक, प्रशासकीय इमारत, प्रगतीपथावर असलेले बस स्‍थानकाचे आधुनिकीकरणाचे काम, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना, इको पार्क, आठवडी बाजार,डॉ  श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, शहरातील अंतर्गत रस्‍त्‍यांचे सिमेंटीकरण, देखणे पत्रकार भवन, पंचायत समितीची सुंदर इमारत, विश्रामगृहाचे बांधकाम, आदिवासी मुलामुलींसाठी वसतीगृह, माळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी वसतीगृह अशी अनेक विकासकामे मुल शहरात त्यांच्या पूढाकाराने पूर्णत्‍वास आली आहे तर काही प्रगतीपथावर आहेत. विकासकामांसह स्‍वच्‍छतेसंदर्भात सुध्‍दा मुल शहराने देश व राज्‍य पातळीवर आपला लौकीक सिध्‍द केला आहे. स्‍वच्‍छ सर्वेक्षण  २०२० मध्‍ये मुल नगर परिषदेने देशात १२ व्‍या क्रमांकाच्‍या स्‍वच्‍छ शहराचा बहुमान प्राप्‍त करत ५ कोटी रू. किंमतीचे पारितोषीक पटकाविले. यापूर्वीही २०१८ मध्‍ये मुल नगर परिषदेला राज्‍यात २८ वा क्रमांक तर २०१९ मध्‍ये देशात तिस-या क्रमांकाचे गुणांकन प्राप्‍त झाले आहे.
 
आकर्षक व देखण्‍या मुल शहरात बायपास रोडचे बांधकाम व रेल्‍वे उड्डाण पुलाचे बांधकाम मंजूर झाल्‍याने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विकासकामांच्‍या दिर्घ मालिकेत आणखी एका महत्‍वपूर्ण विकासकामाचा समावेश झाला आहे. यासाठी ७५ कोटी रू. निधी मंजूर केल्‍याबद्दल केंद्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आभार व्‍यक्‍त केले आहे.