अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र वैद्यता तपासणी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी करण्यात यावे

अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र वैद्यता तपासणी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी करण्यात यावे

माना आदिम जमात मंडळ मुंबई, तालुका शाखा सिंदेवाही च्या वतीने आज दि.२८जून २०२१ रोज सोमवारला, अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र वैद्यता तपासणी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी व्हावे. या मागणीसाठी मा.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा मा.नाम.विजयभाऊ वडेट्टीवार,पालकमंत्री चंद्रपूर यांना तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण श्रीरामे यांचे नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी हरीभाऊ बारेकर, माजी जि.प.सदस्य धनराज घोडमारे,तालुका सचिव ज्ञानेश्वर नन्नावरे,रूकमानंद सावकुडे,स्वप्निल श्रीरामे व तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय सिंदेवाही येथे कार्यालयातील प्रतिनिधी अशोक सहारे व तहसिल कार्यालय सिंदेवाही यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.