chandrapur I ब्रम्हपुरी येथे भाजपा तर्फे मोफत RTPCR चाचणी केंद्र सुरू.

ब्रम्हपुरी येथे भाजपा तर्फे मोफत RTPCR चाचणी केंद्र सुरू.

ब्रह्मपुरी :

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून व ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या प्रयत्नांतून पंचायत समिती मधील संत गाडगेबाबा सभागृह येथे मोफत कोविड RTPCR चाचणी केंद्र १७ मे सोमवार पासून नागरीकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे.

आज या केंद्राचे ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या हस्ते रिबिन कापुन लोकार्पण करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने तहसीलदार विजय पवार साहेब, जि.प सदस्य तथा जिल्हा महामंत्री क्रिष्णा सहारे, पंचायत समिती सभापती प्रा.रामलाल दोनाडकर, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश बगमारे, अधिकारी घुबडे साहेब उपस्थित होते.

ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात कोरोना RTPCR चाचणी केल्यावर रिपोर्ट यायला ४-५ दिवस लागतात या कालावधीत कोरोना ग्रस्त रुग्ण घरी न राहता रोजच्या कामात व्यस्त असतो अशा परिस्थितीत पोसिटीव्ह रुग्णापासून इतर लोकांना बाधा होउ शकते सोबतच चाचणी रिपोर्ट उशिरा आल्याने त्या वर उपचार सुद्धा सुरू होत नाही, यात रुग्णाची प्रकृती गंभीर होत जाते. या सर्व परिस्थिती लक्षात घेत माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर चाचणी केंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येत आहे, या प्रसंगी माजी आमदार अतुल देशकर यांनी माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार ही व्यक्त केले.