chandrapur I चंद्रपूर वनविभागातील चिचपल्ली परिक्षेत्रात आढळले वाघीणीचे शावक

चंद्रपूर वनविभागातील चिचपल्ली परिक्षेत्रात आढळले वाघीणीचे शावक

चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील उपक्षेत्र केळझर नियतक्षेत्र सुशी मौजा दाबगाव मक्ता येथील भाऊजी रघुजी भोंगळे, रा.सुशी यांचे शेत सर्वे क्रं. 127, चक कन्हाळगाव येथे शेतातील विहीरीत अंदाजे सकाळी 9.00 वाजताचे दरम्यान वाघ (मादी) चे शावक अंदाजे 4 ते 5 महिण्याचे असल्याचे माहिती वनविभागाला प्राप्त होताच कु.एस.व्ही.जगताप, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर, एस.एल.लखमावाड, सहाय्यक वनसंरक्षक (सं.अ.), चंद्रपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली, व चंद्रपूर यांचे सोबत चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, फिरते पथक, अतिशीघ्र कृती दल व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे रॅपिड रिस्पॉन्स युनिट (RRU) यांचे मदतीने कॅचस्टीकचे सहाय्याने वाघीण शावकास विहीरीचे बाहेर काढून रेक्यू करून सदर पिल्लुला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुचे देखरेखी मध्ये उपचार सुरू करण्यात आले व त्यांनी शावक स्वस्थ असल्याबाबत कळविले. एन.आर.प्रविण, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर यांचे नेतृत्वात वाघीण शावकास कक्ष क्रमांक 525 (वनविकास महामंडळ, पश्चिम चांदा वनप्रकल्प) सिमेलगत पिंजऱ्यामध्ये रात्री 8.00 वाजता ठेवण्यात आले असता रात्री 9.30 वाजता वाघीण शावकाचे पिंजऱ्याजवळ आली असता शावक ओरडू लागले संपुर्ण परिस्थिती पाहता सदरचे शावक त्याच वाघीणीचे असल्याचे निश्चीत झाल्याने दोरीच्या सहाय्याने पिंजऱ्याचे दार खोलून शावकास निगरीमुक्त करून वाघीण मातेशी यशस्वीरित्या मिलाप करण्यांत आला व वाघीण शावक जवळ घेवून जंगलाचे दिशेने निघुन गेली.