chandrapur I सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरेंन्ट 50 टक्के क्षमतेत सुरू-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरेंन्ट 50 टक्के क्षमतेत सुरू-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चंद्रपूर, दि. 17 मार्च : राज्य शासनाच्या सूचनांनुसार कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सिनेमागृहे, हॉटेल्स व रेस्टॉरेंन्ट 50 टक्के क्षमतेच्या अधिन राहून सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

यासंबंधात सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरेंन्ट तसेच सर्व शाँपीग मॉल्स व धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये या ठिकाणी मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी व ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवणेत यावीत. सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. आदेशाचा भंग केल्यास, संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाईस पात्र राहतील.

याशिवाय कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका, संमेलने तसेच यात्रा, उत्सव, उरुस इ.चे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. विवाह समारंभ कार्यक्रमास फक्त 50 नागरिकांना तर अंतविधी / अंत्ययात्रा इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होणेस फक्त 20 नागरिकांना परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण या अटीचे पालन केले जात असलेबाबत खात्री करतील.

गृह अलगिकरण झालेल्या नागरिक / रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाच्या (डॉक्टर ) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल. कोव्हीड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी कोव्हीड -19 रुग्ण असलेची माहिती नागरिकांना होईल. कोव्हीड-19 पॉझेटिव्ह रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण असा शिक्का मारणे. सदर कोव्हीड-19 रुग्ण गृह अलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही, याविषयी दक्षता घेणेत यावी. गृह अलगीकरणाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड -19 रुंग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थंलातरीत केले जाईल.

आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता सर्व कार्यालये / आस्थापना 50 टक्के क्षमतेच्या अधिन राहून सुरू राहतील. संबंधीतांना घरातून काम करणेबाबत प्रोत्साहित करण्यात यावे.

सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यालय / आस्थापना व्यवस्थापना ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद राहतील.

सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेशे सामाजिक अंतर राखले जाणेच्या दुष्टीकोनातून दर तासाला किती अभ्यांगताना प्रवेश देता येईल या संख्येची निश्चिती करून प्रसिध्द करावी. भाविक तसेच अभ्यागंतासाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पध्दतींचा वापर करावा.

यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्या बाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहतील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही आदेशान नमुद करण्यात आले आहे.