chandrapur I बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज करा

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज करा

चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत बाल संगोपन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध बाल संगोपन स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच वैयक्तिकरीत्या बालसंगोपन योजनेचे अर्ज सादर केले जातात. परंतु या योजनेअंतर्गत फार्म भरून देणाऱ्या मध्यस्थी लोकांकडून आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यत नाकारता येत नाही, तरी अशा लोकांपासून सावध राहून संबंधीतांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता व्यक्तिशः बाल कल्याण समिती येथे अर्ज सादर करावे.

या योजनेचा लाभ नियमित घेण्याकरिता दर वर्षी माहे एप्रिल मध्ये अर्ज नूतनीकरणासाठी अर्ज सादर करावे. यासंबंधी काही अडचण असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांच्याशी संपर्क साधावा किंवा चाइल्ड लाईन क्र. 1098 अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एम. टेटे व जिल्हा परिविक्षा अधिकारी आर. एम. दडमल यांनी कळविले आहे