आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’या विषयावर परिसंवाद

आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’या विषयावर परिसंवाद

नागपूर, दि. 5 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस कार्यक्रमात ‘आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’, या विषयावर रसायनशास्त्र विभागामध्ये चर्चा करण्यात आली.

अध्यक्षस्थानी कुरुक्षेत्र विद्यापीठाचे प्रा. एस. पी. सिंह हे होते. तर तिरुअनंतपुरम केरळ येथील डॉ. कौस्तभ कुमार मैती, प्रा.डॉ. नीरा राघव यांनी सहभाग घेतला.

औषध वितरण ही मानव किंवा प्राण्यांमध्ये उपचारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी फार्मास्युटिकल कंपाऊंडचे व्यवस्थापन करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया आहे. अस स्पष्ट मत त्यांनी या चर्चेत मांडले. रोगाने थेट प्रभावित असलेल्या शरीराच्या विशिष्ट भागात फार्मास्युटिकल उत्पादनाचे व्यवस्थापन करण्यासाठी औषध वितरण नेहमीच डॉक्टरांच्या चिंतेचा विषय आहे. जेणेकरून उपचाराचा प्रभाव जास्तीत जास्त वाढवताना दुष्परिणाम कमी होतील. काही नैसर्गिक पॉलिमरमध्ये असलेल्या रासायनिक भागांच्या मूळ गुणधर्मांचा विचार करून संशोधन गटाने विकसित केलेल्या काही औषध वितरण प्रणालींवर देखील चर्चा करण्यात आली.सूत्रसंचालन शिखा गुप्ता यांनी तर आभार डॉ. पायल ठवरे यांनी मानले.