धार्मीक व जातीय सलोखा आबाधीत राखण्यासाठी जनेतेला आवाहन

धार्मीक व जातीय सलोखा आबाधीत राखण्यासाठी जनेतेला आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी धार्मीक संदेश देणारे बॅनर्स / पोस्टर्स लावण्यात येतात तसेच सोशल मेडीयावर पोस्ट केल्या जातात. नागरीकांनी सदर बॅनर किंवा पोस्ट याद्वारे इतर धर्म किंवा जातीय भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमिवर दि. ०७/१०/२०२५ रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात चंद्रपूर शहरातील सर्व ऑटो संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये ऑटो चालक व मालक संघटनांना धार्मीक भावना दुखवणारे अक्षेपार्ह बॅनर व पोस्टर्स लावण्यात येवु नये असे आवाहन करण्यात आले.

याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या खाजगी वाहनांवर, वास्तुंवर धार्मीक संदेश देणारा बॅनर लावतांना तसेच सोशल मिडीयावर कोणताही संदेश पोष्ट करतांना इतर धर्मीयांची भावना दुखावली जाणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच काही आक्षेपार्ह माहीती आढळुन आल्यास सर्व प्रथम पोलीसांना अवगत करावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता चंद्रपूर पोलीसांना सहकार्य करावे.