‘परिक्षा पे चर्चा’ उपक्रमात नोंदवा सहभाग

‘परिक्षा पे चर्चा’ उपक्रमात नोंदवा सहभाग

 दि. 22 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबत “परीक्षा पे चर्चा” हा  संवादात्मक कार्यक्रम लवकरच  नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर आयोजित होणार आहे.  या कार्यक्रमात इयत्ता 6 वी ते 12 वी मधील सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

“परीक्षा पे चर्चा”कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची निवड करण्यासाठी १२ डिसेंबरपासून  https://innovateindia.mygov.in/ppc-२०२४ / या संकेतस्थळावर बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा आयोजित केली जात आहे. 12 डिसेंबर, 2023 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी वर्गातील विद्यार्थी तसेच शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळणार असून अधिक माहितीकरिता शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेशी संपर्क करावा असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.