महाराष्ट्र – तेलगांना राज्य सिमेवरील मौजा पोळसा गावातील मनोरंजन क्लबचा परवाना रद्द

महाराष्ट्र – तेलगांना राज्य सिमेवरील मौजा पोळसा गावातील मनोरंजन क्लबचा परवाना रद्द

चंद्रपूर जिल्हयातील तेलगांना सिमेलगत उप पोलीस स्टेशन लाठी हद्दीतील मौजा पोळसा या गावात शिवाजी समाधान बोडे यांचे नांवे “राजिव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर ता. कोरपना जि. चंद्रपूर” या नावाने मनोरंजन क्लब चा परवाना / अनुज्ञप्ती होती.

सदर मनोरंजन क्लबच्या नावाखाली सदर ठिकाणी अवैधरित्या जुगाराचा खेळ चालत असल्याबाबतच्या प्राप्त माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन पंचनामा कारवाई करुन दिनांक ०९/०८/२०२५ रोजी उप पोलीस स्टेशन लाठी येथे अपराध क्रमांक २१/२०२५ कलम २२३, २३८, २८९, २९२, ४९, ३ (५) भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर क्लबचे संयोजक यांनी त्यांना प्राप्त परवाना मध्ये दिलेल्या अटी, शर्ती व नियमांचे उल्लंघन केल्याने त्याचा परवाना रद्द होण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी प्रस्ताव तयार करुन मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी त्यांना असलेल्या प्राप्त अधिकारान्वये सदर मनोरंजन क्लबचा परवाना निलंबित केल्याबाबतचा आदेश पारीत केला आहे.