डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित ब्रह्मपुरीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बातमी – मंगेश बनसोड
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा ही स्वागत मंगल कार्यालय ब्रह्मपुरी येथे पार पडली . या सभेला संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पंढरीनाथ रामटेके, उपाध्यक्ष डॉ.ई.एल रामटेके, सचिव श्री प्रभाकर रामटेके, व्यवस्थापक शुभम शेंडे संस्थेचे संचालक श्री .सुधीर अलोने ,जगदीश मेश्राम, ॲड .सुभाष मेश्राम, आसाराम बोदेले,डॉ. विनोद नागदेवते, प्रमोद समर्थ नरेंद्र बांते ,लकी फेरवानी ,संस्थेचे कर्मचारी, सदस्यगण आदी उपस्थित होते. संस्थेच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात शांत पद्धतीने सभा यशस्वी झाली. या सभेचे अध्यक्षस्थान श्री. अशोक पंढरीनाथ रामटेके यांनी भूषविले तसेच सभेचे आभार प्रदर्शन श्री. सुधीरजी अलोने यांनी केले.