पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील HBT घरफोडीचा गुन्हा करणारा आरोपी अटक, १,५०,०००/- रु. चा माल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक ३० सप्टेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक
पेट्रोलींग करीत असतांना चंद्रपूर शहर परिसरात माहिती मिळाली की,
कामरान शेख नावाचा इसम सराफा बाजार चंद्रपूर येथे संशयीत सोन्याचे
दागीने विक्री करीता फिरत आहे. यावरुन स्थानिक गुन्हे शोध पथकाने सराफा
बाजारात सापळा रचुन आरोपी नामे कामरान कदीर शेख वय २४ वर्ष रा.
रहमतनगर चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने
सांगितले की, पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत दिनांक १८/०९/२०२५ रोजी
त्याचा साथीदान नामे नमिर शेख याच्या सोबत एका बंद घराचे कुलूप तोडुन
घरातीने सोन्याचे दागीने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यात ५ नग
सोन्याच्या दागीने वजन १५ ग्रॅम किंमत १,५०,०००/- रुपयाचा माल जप्त
करण्यात आला असुन आरोपीस पोलीस स्टेशन रामनगर पोलीसांचे ताब्यात
देण्यात आले असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुठठावार, इमरान खान, पोअं हिरालाल गुप्ता, शशांक बादामवार, अजित शेन्डे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केली आहे.









