मनसेच्या दणक्यानंतर लगेच राष्ट्रीय महामार्गाची दूरस्ती
ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी पारडगाव फाट्यासमोर निलगिरी बार जवळील नहराच्या पुलीयावर मोठ मोठे खड्डे पडून नहराच्या पुलाचे लोखंडी रॉड चार ते पाच फूट वरती निघून त्या ठिकाणी अनेक अपघात झालेत. याची दखल ब्रम्हपुरी महाराष्ट्र नवनि्माण सेनेने घेत या महामार्गाच्या दुरस्ती करता कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर यांना निवेदन देत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता.मनसेच्या या दणक्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावरील नहरावरील पुलावरील दुरस्थी करण्यात आली आहे.
ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी नहराच्या पुलीयावर मोठ मोठे खड्डे पडून त्या नहराच्या पुलाचे लोखंडी रॉड चार ते पाच फूट वरती निघाले होते त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले.या खड्ड्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते त्यामुळे त्या कामाची दुरुस्ती करून राष्ट्रीयमहामार्ग आठ दिवसात सुरळीत करावा अन्यथा मनसे रस्ता रोको आंदोलन करेल या संदर्भाचा निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रह्मपुरी तर्फे मा संजीव जगताप कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर यांना त्यांचे नागपूर येथील कार्यालयात ब्रम्हपुरी मनसे तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यां्या वतीने देण्यात आले होते .मनसेची आक्रमक भूमिका लक्षात घेता तत्काळ राष्ट्रीय महामार्गावरील नहराचे पुलावरील खड्डे बुजवण्यात आले आहे.