भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीरवायु पदांची भरती

भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ योजनेअंतर्गत
अग्नीवीरवायु पदांची भरती

गडचिरोली,दि.27: भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ या योजनेअंतर्गत अग्निवायू म्हणून भारतीय वायू सेनेत प्रवेश घेवू इच्छिणा-या उमेदवारांकरिता जाहिरात प्रसिदध करण्यांत आली आहे.
सदर जाहिरातीव्दारे अग्नीवायू पदाच्या परीक्षेकरिता http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याचा कालावधी दि.27 जुलै 2023 ते 17 ऑगस्ट 2023 पर्यंतचा आहे. अग्निवायू पदांकरिता दि.27 जून 2003 आणि दि.27 डिसेंबर 2006 च्या दरम्यान जन्म झालेला असावा. हे उमेदवार अर्ज करण्याकरिता पात्र असतील.
अग्नीवीरवायू पदाची ऑनलाईन परिक्षा दि.13 ऑक्टोबर 2023 रोजी पासून असणार आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पोलीस मुख्यालया समोर शासकीय संकुल बॅरेक क्र.2, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त ‍जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली. यांनी कळविले आहे.