‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत वृक्ष लागवड मोहीम

‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत वृक्ष लागवड मोहीम

चंद्रपूर, दि. 3 : राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण असणे आवश्यक आहे. सद्यास्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण 21.25 टक्के आहे. राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत वर्ष 2025 मध्ये 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्याबाबत मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत.

त्या अनुषंगाने कडुनिंब, चिंच, सिताफळ, बेहडा व पेरु या रोपांची वृक्ष लागवड जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांच्या निर्देशनाखाली करण्यात आली. यावेळी कार्यालयीन कर्मचारी भी.एन. रामगडे, व्ही जी. जुमडे, नितीनकुमार रामटेके, सुभाष हेडावू, राकेश पोटे, अजय राठोड, ईश्वर चौखे उपस्थित होते.