जिल्हा माहिती कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

जिल्हा माहिती कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

चंद्रपूर दि. 31 ऑक्टोबर: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ- दांदळे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इंदिरा गांधीच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाचे महत्व सांगून त्यांच्या कार्यातील विविध पैलू उलगडून दाखवतांना पटेल यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. अखंड भारतासाठी सरदार पटेलांच्या योगदानाचे महत्व देखील सांगितले. यावेळी कार्यालयातील बंडू राठोड, सविता चिवंडे, विजय जाधव, पुष्पाकर ढोमने, सुधीर आत्राम, सचिन खोब्रागडे, प्रविण ठाकरे यासह कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर कोरोना वर्तणूक विषयक नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.