chandrapur I धान खरेदी करणे शासनावर बंधनकारक नाही, या शासन परिपत्रकाचा निषेध

धान खरेदी करणे शासनावर बंधनकारक नाही, या शासन परिपत्रकाचा निषेध

धान खरेदी केंद्रावर सात बारा दिला तरी धान खरेदी करणे शासनावर बंधनकारक नाही. धान खरेदी केले पाहिजे याची शासनाची जबाबदारी नाही असे शासन परिपत्रक काढल्याने शेतकरयात असंतोष भडकला असून ,शासनाप्रती रोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग म. राज्य मंत्रालय मुबंई 32 परिपत्रक क्रमांक संकिर्ण- 1020/प्र. क.104(भाग 2) ना प्र 29, दिनांक 19 मे 2021 हे महाराष्ट्र शासनानी परिपत्रक काढल्याने शेतकरी खडबडून ऊठले व दिनांक 04/04/2021 रोजी कोरोनाचे नियम व निकसाचे पालन करून सभा घेण्यात आली. सभेत या शेतकरी विरोधी शासन परिपत्रकाचा निषेध करण्यात येवून शासनाने हे परिपत्रक मागे घ्यावे व रद्द करावे आणि शेतकरयानी पिकवलेल्या धानाची खरेदी करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. असा सुधारित परिपत्रक काढण्यात यावे, असे निवेदन शेतकरी शेतमजूर महासंघ सिदेंवाही च्या पदाधिकार्यानी , मा. तहसीलदार मार्फत, मा.उध्दवजी ठाकरे , मुख्यमंत्री, व विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांना सादर केली.
या निवेदनाचा विचार सरकारने केला नाही तर शेतकरी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात , रघुनाथजी शेंडे अध्यक्ष, सुदामजी खोब्रागडे, लोकमित्र गेडाम, अशोक सागुळले, राजु ताडाम, अशोक तुम्मे, माधव आदे, दिनकर बोरकर,रूषी लोखंडे, गणेश हाडेंकर, मुरलीधर चैधरी, टिकाराम दोडके, यादव बोरकर, अंबादास दंडीकवार,राजेश्वर सहारे,लता गेडाम, शांताबाई पाझारे, जानकिराम वाघमारे, कमलाकर कावळे,सहादेव खोब्रागडे, इत्यादी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.