649 मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन / फिरते विसर्जन कुंड रथाचे उदघाटन

649 मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन / फिरते विसर्जन कुंड रथाचे उदघाटन

चंद्रपूर 28 ऑगस्ट – माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 3 फिरत्या विसर्जन रथाचे आज आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते फीत कापुन उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी,सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,डॉ.नयना उत्तरवार,डॉ.अमोल शेळके, उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,चैतन्य चोरे व मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांसाठी झोननिहाय संपर्क क्रमांक महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.

शहरात दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जन व्यवस्थेची गरज भासते. दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याच्या दृष्टीनं मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या 25 कृत्रिम तलावात गुरुवार 28 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत 649 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे तसेच सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील विसर्जन रथाची माहिती घेण्याकरिता पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

● झोन 1 – 98815 90402,9011018652

● झोन 2- 90759 25310,9011018652

● झोन 3 – 80807 79446,9011018652