त्या बातमीचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काहिही संबंध नाही

त्या बातमीचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काहिही संबंध नाही
◆ संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शीपणे
◆ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा खुलासा
गडचिरोली, दि.07: गडचिरोली जिल्ह्यात सामान्य रुग्णालय हे २५२ खाटांचे असून ५० खाटांचे ३ उपजिल्हा रुग्णालय व ३० खाटांचे ९ ग्रामिण रुग्णालय आहेत. या रुग्णालयांत दररोज जवळपास २५०० ते ३००० रुग्णांना आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवांचा लाभ देण्यात येतो. गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल व अतिदुर्गम नक्षलग्रस्त व भौगोलिकदृष्टया मागास आहे. त्यामुळे येथील जनतेला संपूर्ण विनामुल्य व दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण व आदिवासी उपयोजने अंतर्गत प्राप्त अनुदानातुन मेडीसीन विभाग, शल्यक्रिया सर्जरी विभाग, अस्थिव्यंग चिकित्सा, दंत चिकित्सा, चर्मरोग व गुप्तरोग, मानसिक रोग विभाग, नेत्र चिकित्सा, हिवताप उपचार, कान-नाक-घसा विभाग, बालरोग चिकित्सा, नवजात बालकांच्या कक्षाकरीता, लसीकरण विभागाकरीता, गरोदरमातांकरीता, प्रसुती व स्त्रीरोग विभागाकरीता, प्रयोगशाळा तपासणी करीता इत्यादी विभागाकरीता लागणारे अत्यावश्यक औषधी, कंझ्युमेबल, उपभोग्य वस्तु, प्रयोगशाळा रसायने, उपकरणे व यंत्रसामुग्रीचा पुरवठा केल्या जातो. त्याअनुषंगाने आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण व आदिवासी उपयोजने अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातुन जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, गडचिरोली, तिन उपजिल्हा रुग्णालये व ९ ग्रामिण रुग्णालयाकरीता प्राप्त मागणीनुसार प्रस्ताव तयार करुन तांत्रिक मान्यतेकरीता मा. उपसंचालक, नागपूर मंडळ, नागपुर यांचेकडे सादर करुन तांत्रिक मान्यता प्राप्त करुन प्रशासकिय मान्यतेकरिता जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती गडचिरोली यांचेकडे सादर करण्यात येतो.
त्यानंतर प्रशासकिय मान्यता व मंजुर नियतव्ययानुसार जिल्हास्तरावरील गठीत जिल्हा खरेदी समिती यांचेकडुन प्राप्त झालेल्या प्रशासकिय मान्यतेच्या अनुषंगाने खरेदी प्रस्तावातील अत्यावश्यक बाबीचे महाराष्ट्र शासनाचे ई निविदा प्रक्रिया http://arogya.maharashtra.gov.in/ व https://mahatenders.gov.in वेबसाईटवर तसेच प्रसिध्द वृत्तपत्रामध्ये जाहीरात प्रकाशित करुन ई निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील व इतर राज्यातील इच्छुक पुरवठाधारक ई-निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. करिता पुरवठाधारकांसोबत संगनमत करुन ई-निविदा प्रक्रिया राबविणे शक्य नाही. त्यामुळे ई-टेंडरींग संगणमताने केल्या जाते हा आरोप नितांत खोटा असुन यात कोणतेही तथ्य नाही. जिल्हा नियोजन समितीचे संपूर्ण जिल्हयाकरिता वार्षिक बजेट (अर्थसंकल्पीय तरतुद) ही कोणत्याही वर्षात ३०० कोटींपेक्षा जास्त असत नाही. आणि सदर निधीचे वाटप जिल्हयातील विविध विभागांमध्ये मागणीच्या अनुषंगाने वितरीत करण्यात येत असते. गेल्या ८ ते १० वर्षात 500 कोटी एवढा निधी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोलीला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे १ हजार कोटी रुपयांची साहित्य खरेदी, हा आरोप खोटया स्वरुपाचा आहे. डॉ.अनिल रुडे हे मागील ८ ते १० वर्षापासुन रुग्णालयांकरीता निकृष्ट दर्जाची यंत्रसामुग्री खरेदी करत असल्याचे नमुद आहे. जेव्हा की, डॉ.अनिल रुडे, जिल्हा शल्यचिकित्सक हे दिनांक १४.०६.२०१८ ते दिनांक ३१.०५.२०२३ पर्यंतच म्हणजेच जवळपास फक्त ५ वर्ष कार्यरत होते. त्यामुळे दिलेली माहिती जिल्हास्तरावरील गठीत जिल्हा खरेदी समिती यांचेकडुन खरेदी प्रस्तावातील अत्यावश्यक बाबीचे ई निविदा प्रक्रिया महाराष्ट्र शासनाचे http://arogya.maharashtra.gov.in/ व https://mahatenders.gov.in वेबसाईटवर तसेच प्रसिध्द वृत्तपत्रामध्ये जाहीरात प्रकाशित करुन ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असते. गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम भाग, व आदिवासी बहुल व मागास असल्यामुळे व महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे, तसेच अतिदुर्गम भागा मध्ये दळणवळणाची सुविधा असल्यामुळे महाराष्ट्रातील व इतर राज्यातील इच्छुक पुरवठाधारक ई-निविदा प्रक्रियेमधील अटी व शर्तीनुसार सहभागी होत असतात. तसेच पुरवठाधारकांकडुन संबंधीत उपकरणे, साहित्य सामुग्री ही बाजारभावापेक्षा जास्त नाही याचे प्रतिज्ञापत्र घेत असतो. त्यामुळे राबविन्यात आलेली प्रक्रिया ही अतिशय पारदर्शीपणे असून यात मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य  रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.