26 ऑगस्ट रोजी ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह’

26 ऑगस्ट रोजी ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह’

चंद्रपूर, दि. 25 : ‘आधा घंटा रोज, फिटनेस का डोज’ या संकल्पनेवर आधारीत चंद्रपूर जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच क्रीडा विभागाच्या व ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता सायकलथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सायकलिंग ड्राईव्ह सरदार पटेल हायस्कुल पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक – दुर्गापूर रोड- पद्‌मापूर गेट ते पोलिस सभागृह तुकूमपर्यत आयोजित करण्यात आली आहे.

या सायकलिंग मध्ये जिल्हा पातळीवरील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलिस कुटूंबियांचा सहभाग असणार आहे. तसेच शालेय विद्यार्थी आणि चंद्रपूर शहरातील गो ग्रीन सायकल ग्रपच्या सदस्यांचा सुध्दा सहभाग असणार आहे. सदर सायकलथॉन चा मुख्य उद्देश ‘से नो टू ड्रग्ज डोज’ – ‘आधा घंटा रोज, फिटनेस का डोज’ या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन नशामुक्त आणि फिटनेस जिल्हा बनविण्यास योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.