जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी करा. O अभियानात 50 लाखा पर्यंत बक्षीस

जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी करा.

अभियानात 50 लाखा पर्यंत बक्षीस

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यात 19 ऑक्टोंबर ते 30 जानेवारी या कालावधीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2023- 24 मध्ये राबविण्याचे राज्यस्तरावरुन निर्देश देण्यात आले असुन, चंद्रपुर जिल्ह्यातील गावात अभियान यशस्वी करा असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

          संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सर्व ग्रामीण कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर समिती गठण व कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. दिनांक 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर या काळात जिल्हा परिषद गट स्तरावर स्पर्धा राबविण्यात येणार असुन, या स्पर्धेअंतर्गत गावांची समिती मार्फ़त तपासणी करण्यात येणार आहे. 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर अखेर जिल्हा परिषद गट स्तरावर प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. दिनांक 6 ते 21 डिसेंबर अखेर जिल्हा परिषद गट अंतिम तपासणी केली जाणार आहे. दिनांक 22 डिसेंबर ते 6 जानेवारी अखेर जिल्हास्तरावर तपासणी, दिनांक 7 ते 30 जानेवारी अखेर विभागीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे.जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सफ़ाई कामगारांना जिल्हा परिषद गट स्तरावर 5 हजार रुपये, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकास 9 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 8 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये, बक्षीस देण्यात येणार आहे.

          राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे अंतर्गत ग्रामपचायतींनी जिल्हा परिषद गट स्तरावर प्रथम 60 हजार रुपये, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकास 6 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 4 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 3 लाख रुपये, विभाग स्तरावर प्रथम क्रमांकास 12 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 9 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 7 लाख रुपये, राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 35 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 30 लाख रुपये, बक्षीस दिले जाणार आहे. स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा सांडपाणी व मॅलागाळ व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीस विशेष पुरस्कार दिला जाणार असुन, जिल्हास्तरावर 50 हजार रुपये , विभागस्तरावर 75 हजार रुपये, राज्यस्तरावर 3 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. या संधीचा चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व  ग्रामपंचायतींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छ्ता) नुतन सावंत यांनी केले आहे.