अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता इयत्ता 1 ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रकियेला सुरुवात

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता इयत्ता 1 ली मध्ये शहरातील
इंग्रजी माध्यमाच्या नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रकियेला सुरुवात

गडचिरोली, दि.08: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामंकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2024-25 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा व दिनांक 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्यांचा पालक शासकीय/निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत आदीम जमाती/ दारीद्रय रेषेखालील/विधवा/घटस्फोटित व निराधार यादीतील पाल्याचा प्राध्यान्याने विचार केला जाईल. इयत्ता 1 ली प्रवेशसाठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
इयता 1 ली प्रवेशासाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली तसेच प्रकल्पांतर्गत नजीकच्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेशासाठीचे आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह दि. 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यालयास सादर करण्यात यावे. असे सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी कळविले आहे.