विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेवून अभाविप आक्रमक.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेवून अभाविप आक्रमक.

 कुलगुरूंच्या दालनाला विद्यार्थांचा घेराव

विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

चंद्रपुर: अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम याच्या नेतृत्वात बुधवार, 20 सप्टेंबर ला गोंडवाणा विद्यापीठात विद्यार्थ्याच्या समस्यांना घेवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यानी सहभाग घेतला असून विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विध्यार्थी नाहक त्रास सहन करत आहे. विद्यापीठातर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालय तसेच तेथील ज्वलंत मुद्धे तसेच लंबित समस्यांना घेवून अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम ह्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे ह्यांना निवेदना द्वारे विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या.
निवेदनात उल्लेखित १) परिक्षा व मुल्यमापन मंडळ विभागाचे दि. ०५/०९/२०२३ रोजी उन्हाळी २०२३ या परिक्षेच्या पुनः मुल्यांकन / साक्षांकित छायाप्रती करिता अर्ज करण्यास मुदतवाढ च्या परिपत्रकानुसार अद्यापही लिंक सुरु करण्यात आली नाही त्यामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत, तरी त्वरीत लिंक सुरु करावी.
२) अकॅडमिक कॅलेंडर नुसार PET परिक्षेची तारीख आतापर्यंत विद्यापीठाने जाहीर केली नाही किंबहुना त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नसून तरी लवकरात लवकर PET परिक्षेची तारीख जाहीर करण्यात यावी.

३) फोटोकॉपी च्या दिरंगाईमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे यावर विद्यापीठाने आपली भुमिका स्पष्ट करावी.

४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे दि. ०६ सप्टेंबर, २०२३ चे परिपत्रक क. १९७/२०२३ च्या पार्श्वभुमीवर गोंडवाना विद्यापीठानेही निर्णय घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. (संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व्दारा ही याच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.)

५) पुर्नःमुल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या गुणपत्रिका पाठविण्यात आल्या याबद्दल विद्यापीठाने स्पष्टीकरण द्यावे तसेच अशा सर्व विद्यार्थ्यांना त्वरीत सुधारित गुणपत्रिका पाठविण्यात यावे.
६) पुर्न: मुल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पुर्नमुल्यांन शुल्क परत करण्यात यावे. या मागण्यांना घेवून या संदर्भात
विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून तातडीने निर्णय घ्यावा अशा आशयाचे निवेदन अभाविप कडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्या आहे.
यावेळी अभाविप चे विभाग संयोजक वैदेही मुडपल्लीवार, गडचिरोली जिल्हा संयोजक हिरालाल नूरटी, चंद्रपूर जिल्हा संयोजक पीयूष बनकर, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक संदेश उरकुडे  आदि पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विद्यापीठ क्षेत्रातील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.