पोलीसांची धाडसी बचाव मोहिम पुराचे पाण्यात अडकलेले शालेय विद्यार्थ्यांना सुखरुप पोहचविले
पोलीस स्टेशन विरुर ची कामगिरी
चंद्रपूर जिल्हयात मागील दोन दिवसापासुन सतत पळत असलेल मुसळाधार पावसाळया मुळे जिल्हयातील धरणे, नदी, नाले यांना पुर येवुन अनेक मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असतांना दिनांक २३/०७/२०२५ रोजी पोलीस स्टेशन विरुर अंतर्गत मौजा वरुन ते विरुर मार्गावरील नाल्याला पुर आल्याने दोन महामंडळ बस चिचबोर्डी, सिर्शी गावाजवळ रोडवर सांयकाळी ६:३० वाजल्यापासुन अडकेल्या आहे आणि बस मध्ये २५ ते ३० शाळेचे विद्यार्थी आणि २५ ते ३० गावकरी नागरीक अडकलेले आहेत अशी माहिती विरुर पोलीसांना मिळताच पोलीस स्टेशन विरुर चे ठाणेदार सपोनि श्री संतोष वाकडे हे तात्काळ पोलीस स्टॉफ सह शासकीय वाहनाने सदर ठिकाणी पोहचुन पुराचे पाण्यामुळे अडकलेल्या आणि सकाळ पासुन उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांकडे जावुन त्यांना नाश्ता, बिस्कीट आणि पाण्याची व्यवस्था केली व त्यांना धिर देवुन अंदाजे दोन अडीच तास त्यांच्या सोबत राहुन पुराचे पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने शासकीय वाहन दोन्ही बस च्या समोर लावुन त्यांना अडकलेल्या ठिकाणाहून बाहेर काढुन शाळेतील मुलांचे पाल्य, आई-वडील काळजी करत असल्याने विद्यार्थ्यांच्या गावी डोंगरगांव, सुबई, कविडपेठ, चिंचोली ईत्यादी गावात जावुन प्रत्येक विद्यार्थ्यांना रात्रौ १२ पावेतो सुखरुप त्यांचे घरी पोहचवुन दिले.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विरुर ठाणेदार सपोनि श्री संतोष वाकडे यांचे नेतृत्वात परि. पोउपनि श्री दत्ताहरी जाधव, पोहवा /२५०३ विजय मुंडे, पोअं/१४९ राहुल वैद्य, पोअं/२१३ हर्षल लांडे, पोअं/२९० हर्षल चौधरी, पोअं/२१९९ बिभीषण खटके, पोअं/४८३ सौरख पगडपेललीवार, चापोअं/२४०३ संजय कोडापे सर्व पोलीस स्टेशन विरुर यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षक श्री मुम्मक सुदर्शन यांनी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन केले की-पाणी साचलेल्या भागात जाणे टाळा, विद्युत उपकरणांपासुन दूर रहा, पाणी वाहत असलेल्या पुल ओलांडु नका, पुर परिस्थितीत किंवा आपातकालीन परिस्थितीत ११२ वर कॉल करा. चंद्रपूर पोलीस नागरीकांच्या सुरक्षेकरीता सदैव तत्पर आहे.