” नागभीड पोलीसांनी कान्पा परीसरात वेगवेगळया ठिकाणी मोहा हातभट्टी अड्डयावर टाकल्या धाडी”
दिनाक 16.07.2025 रोजी पो.स्टे. नागभीड अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्डयाबाबत गोपनिय माहीती काढुन पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेल्या आहेत. 01) आरोपी नामे राहुल तिमाजी मोहनकर वय 27 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू 40 लिटर व मोहा फुल सडवा 350 किलो व साहीत्य असे एकुण 22,700/- रूपये चा मुद्देमाल मिळून आला. 02) आरोपी नामे विलास सुर्यभान खोब्रागडे वय 38 वर्षे रा. कान्पा ही जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू 30 लिटर व मोहा फुल सडवा 1050 किलो व साहीत्य असे एकुण 53,700/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आला. 03) आरोपी नामे महेंद्र तिमाजी मोहनकर वय 34 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहा फुल सडवा 950 किलो व साहीत्य असे एकुण 45,200/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आला. 04) आरोपी नामे रविंद्र धनराज अलोने वय 35 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहा फुल सडवा 900 किलो व साहीत्य असे एकुण 42,950/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद 04 आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करून त्यांचेकडुन एकुण 1,61,550/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा.श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक, मा.श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक मा.श्री.दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे नेतृत्वात सफौ. /७३१ सुरसेन बिके पो.अं./१०२५ किशोर देशमुख, पो.अं./२२० ज्ञानेश्वर गिरडकर, पो.अं./१९७१ दिलीप चौधरी, पो.अं./१४७९ भरत घोळवे, म.पो.अं./१५५६ महानंदा आंधळे,म.पो.अं./३९९ अरूणा धुर्वे यांचे पथकाने केली.