वरोरा येथील घरफोडीचा गुन्हा १२ तासाचे आंत उघड चोरीस गेलेल्या सोने-चांदीचे दागीनेसह आरोपी अटक
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक ११ जुलै, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे (१) अनिल उर्फ कुंभकर्ण येलज्जी लोणारे वय ३० वर्ष रा. कर्मवीर वार्ड वरोरा, (२) अरविंद उर्फ कावळा नामदेव सातपुते वय ३८ वर्ष रा. कर्मवीर वार्ड वरोरा रा. कर्मवीर वार्ड वरोरा रा.कर्मवीर वार्ड वरोरा (३) रंगा शंकर चिंतलवार वय ५५ वर्ष रा. फिरस्ता यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन वरोरा अपराध क्रमांक ४२९/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता हा घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरलेले सोन्या-चांदीचे दागीने हस्तगत करण्यात आले असुन आरोपींना वरोरा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री संतोष निभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, सफौ धनराज करकाडे, पोहवा अजय बागेसर, सचिन गुरनुले, चेतन गज्जलवार, पोअं किशोर वाकाटे, गणेश भोयर, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे, चापोअं वृषभ बारसिंगे व मिलीट टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.