तेलगंना राज्यामध्ये अवैधरित्या कत्तलीकरीता वाहतुक होणारे ०६ ट्रक मधील ७२ जनावरे गोवंश एकुण १,७०,७०,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
दिनांक २१/०६/२०२५ रोजी प्राप्त माहिती वरून काही ट्रक मध्ये जनावरे (गोवंश) यांचे हात, पाय, तोंड बाधुन व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना दाटीने भरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करीता घुग्घुस मार्ग पडोली, चंद्रपुर असे तेलगंना अवैधरित्या वाहतुक करीत आहे अशा माहिती वरून धानोरा टोल नाका, घुग्घुस रोड येथे नाकाबंदी करून खबरे प्रमाणे ०६ आयचर ट्रक हे घुग्घुसचे दिशेने आले. त्यावरून नमुद ट्रकची पंचा समक्ष पाहणी केली असता, वेगवेगळया ट्रक मध्ये जनावरे (गोवंश) यांचे हात, पाय, तोंड बाधुन व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना दाटीने भरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करतांना मिळुन आले. सदर वाहनाचे चालक, क्लिनर यांना वाहतुक करीत असलेल्या जनावरा बाबत कागदपत्र माहितले असता त्यांनी भंडारा, गोदिया येथुन जनावरे खरेदी केल्याचे पावत्या सादर केल्या. त्यावरून सदर पावत्या संबंधाने पडताळणी केली असता जनावरे वाहतुक करीत असलेल्या पावत्यावर सरकारी अधिकारी यांची बनावट सही करुन त्याव्दारे सदर वाहतुक ही कायदेशिर असल्याचे दाखवुन अवैधरित्या प्राण्यांची कुरपणे वाहतुक करत होते, त्यावरून नमुद ट्रक चालकांकडुन ०६ ट्रक, जनावरे वाहतुक करण्यासाठी वापरलेली पायलटींग वाहन व एकुण ७२ गोवंश असा एकुण १,७०,७०,०००/- रू चा माल जप्त करून एकुण १८ आरोपीतां विरुध्द पोलीस स्टेशन, घुग्घुस येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
अवैधरित्या कत्तली करीता वाहतुक करीत असलेले जनावरे हे सुरक्षेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपुर, जि. चंद्रपुर यांचेकडे जमा करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. संतोष निंभोरकार, पोउपिन सुनिल गौरकार, सफौ/धनराज करकाडे, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा / रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/जयसिंग, पोहवा/गणेश मोहुर्ले, नापोशि/संतोष येलपुलवार, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/प्रशांत नागोसे, पोशि/किशोर वाकाटे, पोशि/शशांक बदामवार, चपोहवा / दिनेश अराडे, चपोशि/रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोलीस स्टेशन, घुग्घुस येथील सपोनि तायवाडे असे अधिकारी व कर्मचारी तसेच पशुधन विकास अधिकारी, घुग्घुस यांनी केली आहे.












