११ ऑक्टोबरला महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक

११ ऑक्टोबरला महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक

चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक ११ ऑक्टोबारला होणार आहे. त्यासाठी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३० तरतुदी अन्वये महिला व बालकल्याण समितीच्या 
सदस्यांतून सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्याकडील पत्रानुसार समितीची विशेष बैठक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत दुसरा माळा, राणी हिराई सभागृहात होत आहे. 
 
सभापती निवडणुकीसाठी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगरसचिव यांच्या कार्यालयात कोरे नामनिर्देशन पत्राची उचल करता येईल. १० रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे, ११ रोजी १२ वाजता सभा सुरु झाल्यावर नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. त्यानंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार मतदान होईल.