सिंदेवाही मेंढा माल जवळ गळफास लावून आत्महत्या

सिंदेवाही मेंढा माल जवळ गळफास लावून आत्महत्या

सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल जंगल परिसरात पळसाच्या झाडावर दोरीच्या सहाय्याने एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचासमक्ष घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले आहे.

मृतकाचे नाव ओमप्रकाश पत्रुजी ठाकरे वय २९ वर्षे राहणार – बाबुपेठ, बांबेडकर नगर, चंद्रपूर येथील असुन मृतकाचे व्यवसाय घर बांधकाम कंत्राटदार होता.

मृतक ओमप्रकाश ठाकरे दोन दिवसांपासून घरून निघून गेला होता, त्याचा शोध न लागल्याने नातेवाईक यांनी पोलिस स्टेशन रामनगर चंद्रपूर येथे ओमप्रकाश ठाकरे बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसा अगोदर केली होती.

या घटनेचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ ठवकर करित आहेत.