१३ वर्षीय अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमास २० वर्षाची सश्रम कारावास
तर आरोपीस मदत करणारी ३० वर्षीय महिलेस ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
पोलीस स्टेशन पडोली हद्दीत माहे जानेवारी २०२० मध्ये एका ३५ वर्षीय तरुणाने त्याच्या ३० वर्षीय महिला मित्राचे मदतीने घरासमोरील १३ वर्षीय अल्पवयीन बालीकेस आपल्या घरी बोलावुन तिचेवर अत्याचार केला होता. पिडीताचे रिपोर्टवरुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा नोंदविण्यात येवुन गुन्हयाचा तत्कालीन तपासी अधिकारी श्रीमती मेघा गोखरे यांनी सखोल तपास करुन आरोपीविरुध्द भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता आज दिनांक २१ मे, २०२५ रोजी कोर्ट विद्यमान मा.श्री पि.जी. भोसले, अतिरिक्त सत्र न्यायाधिश तथा जिल्हा न्यायाधिश-३ चंद्रपूर यांचे न्यायालयात आरोपी इसमास कलम ३७६ (२) (एन) भादंवि मध्ये १० वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड, कलम ३७६ (३) भादंवि मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड, तर कलम ६ पोक्सो अॅक्ट मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली तर सदर आरोपीला गुन्हा करण्यास मदत करणारी ३० वर्षीय महिलेला सुध्दा कलम ३५४ (अ) (१) (आय) भादंवि मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंड, तसेच कलम ८ पोक्सो अॅक्ट मध्ये ०५ वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सदर प्रकरणात शासनाची बाजु सरकारी अभियोक्ता श्री आसीफ शेख जिल्हा सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला आहे.
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा १५२९ मधुराज रामानुजवार पोस्टे पडोली यांनी मोलाची कामगिरी केली आणि दत्तक अधिकारी म्हणुन सहायक पोलीस निरीक्षक श्री योगेश हिवसे, ठाणेदार पो.स्टे. पडोली यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.









