वस्त्र चित्रकलेचे मोफत प्रशिक्षण घ्यायचयं ? तात्काळ अर्ज करा
भंडारा,दि.28 : भारत सरकार , महाराष्ट्र शासन एवं बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था , भंडारा संस्थेद्वारा निशुल्क (फुकट) प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक 02 डिसेंबर 2024 पासून वस्त्र चित्रकला उद्यमी ( टेलरिंग चे प्रशिक्षण, भरतकाम आणि फॅब्रिक पेंटिंग उद्योजक) चे 30 दिवसीय प्रशिक्षण सुरु होत आहे.या प्रशिक्षणामध्ये हँड एम्ब्रोईडरी भरतकामाचे धागे, पोत कापडानुसार धागे,सुया निवडणे, फॅब्रिकचे ड्रेस मटेरियल, टेरेस मॅटवर शिलाईचे व्यवहारिक ज्ञान, मशीन भरतकाम भरतकामाचे डिझाईनिंग ,रंग मिक्सिंग , बुरशेष पद्धत कापड पेंटिंगची निवड ,थ्रीडी पेंटिंग, फिंगर पेंटिंग, निब पेंटिंग,पिलो कव्हर,बेड कव्हर ,पेंटिंग साडी आणि चुडीदार पडद्यावर रंगकाम हातच्या पिशव्य, पर्स पेंटिंग, बुटीक रेडीमेड गारमेंट मुद्रित कापडावर पूर्ण फॅब्रिक पेंटिंग, व्यवसायिक सुरक्षा, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, इत्यादी.
प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना जेवण, चाय, नास्ता, वही,पुस्तके व राहण्याची आदी सोय मोफत केली जाईल. स्वयं रोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय १८ ते ४५ वर्षे , शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा पुरुष मंडळी नी मुलाखती करीत 02 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजता बी. ओ. आय. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था लालबहादूर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला शास्त्र चौक भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगळे यांनी कळविले आहे .या करिता संपर्क क्र. 9511875908, 8669028433, 9766522984, 8421474839