विद्यार्थींनी आत्मनिर्भर व स्वरक्षणासा ठीप्रशिक्षण घेवून स्वत:चे रक्षण करावे

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थींनी आत्मनिर्भर व स्वरक्षणासा ठीप्रशिक्षण घेवून स्वत:चे रक्षण करावे

गडचिरोली, दि.11:अलीकळील काळात महिला व मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातुन त्यांची केली जाणारी हत्या त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाळकरी व महाविद्यालयी वय 15 ते 25 वयोगटातील युवती यांना राजमाता जिजाऊ युवती स्वरंक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक तालुका 1000 याप्रमाणे युवतींना प्रशिक्षकाद्वारे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, गडचिरोली व विद्यार्थी निधी ट्रस्ट तसेच ऑल इंडिया थागता असोशिएशन आणि गोंडवाना विद्यापीठ, शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने दिनांक 10 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कुल, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्यातील पहिला राजमाता जिजाऊ युवती स्वरंक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने महिला व बाल विकास विभाग, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभ हस्ते उदघाटन संपन्न झाले. अध्यक्ष म्हणून आमदार देवराव होळी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र हे उपस्थित राहुन विदयार्थांना मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमाला आभासी पदधतीने उपस्थित राहुन प्रशांत नारनवरे आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांनी विदयार्थांना मार्गदशन केले.

तसेच प्रमख उपस्थिती म्हणुन निलेशकुमार वाघ पोलीस निरीक्षक सायबर गुन्हे विभाग, गडचिरोली सहा. पोलीस निरीक्षक रूपाली पाटिल, श्रीमती एच जे परसागट शिक्षणाधिकारी, गडचिरोली, प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नारायण परांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामिण गडचिरोली , विनोद पाटिल जिल्हा परिविक्षा अधिकारी गडचिरोली ,श्रीमती रूपाली काळे संरक्षण अधिकारी गडचिरोली, अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संजय मुरकुटे ऑल महाराष्ट्र थांगसा असोशिएशन गड, चव्हान सर, संजय गददेवार, विदया भारती कन्या हॉय. गड, शिक्षक पुनम आभारे शिक्षीका शिवाजी हॉयस्कुल कार्यक्रमाला उपस्थित होते.

मंत्री महोदय यांनी राजमाता जिजाबाई युवती स्वरक्षण प्रशिक्षणात उपस्थित विदयार्थीना सदयास्थितीत विदयार्थीनी व महिलांनी आपले स्वतःचे रक्षण करण्याकरिता त्यांनी स्वतः सक्षम होवून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला वसंत विदयालय गडचिरोली, विदया भारती हॉयस्कुल गडचिरोली, शिवाजी हॉयस्कुल विज्ञान कनिष्ठ महाविदयालय गडचिरोली, जि.प.हॉयस्कुल गडचिरोली, राणी दुर्गावती कन्या हायस्कुल गडचिरोली, महिला महाविदयालय गडचिरोली येथील अंदाजे 1200 विदयार्थीनी कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना महिला व मुलींवरील हिंसाचार संसकल्पना व सदयास्थिती आणि तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर निलेशकुमार वाघ सायबर गुन्हे विभाग यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले तर सुत्रसंचालन जयंत एस,जथाडे मास्टर ट्रेनर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गड व आभार प्रदर्शन विनोद पाटिल जिल्हा परिविक्षा अधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमाला संरक्षण अधिकारी कनिष्ठ पुरूषतोम मुजुमदार, अभिलाश कुनघाडकर पियंका आसुटकर, कवेश्वर लेनगुरे, तनोज ढवगाये, रविंद्र बंडावार, किरमीरवार समुपदेश पुजा धमाले, उज्वला नाकाडे, निलेश देशमुख, अभिलाश कुनघाडकर हे उपस्थित राहुन यांचे सहकार्य लाभले. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.